सचिन सचिन...

।। श्री ।।

२५ सप्टेंबर २०१४ / रात्रीचे १२.५३

प्रत्येकाचा देव ठरलेला असतो... त्याच्या त्याच्या वयानुसुनार... माझा होता... 'सचिन... सचिन' अजुन ही आहे :)

सचिन सचिन, सचिन आला रे... आईला सचिन!...
10DULAKR...गॉड ऑफ़ क्रिकेट!... ह्या देवानी क्रिकेट विश्वच काय तर लाखो मुलांचं भविष्य पण बदललं असेल...त्याच्या खेळी वर फीदा होऊन करियर चेंन्ज करून... त्याचा आदर्श ठेउन!

तोच आदर्श आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची ओढ़ माझ्या नसानसात भरलेली...
'अरे दारिद्र्य येइल अश्यानी...'
'किती कागदं फाडणारेस!?'
'रद्दीत घालवू नकोस असे पैसे'
'अरे इतकं मन लाउन अभ्यास केलास तर... अमुक तमुक...'
पण मी टोणगा!
आई बापाचं नं एकण हा जणू जन्म सिद्ध हक्क!
अगदी 5mm पासून अक्खी पोस्टरं, जिथे तो दिसायचा मी फाडायचो,
वेड लागलेलं सचिनच्या चेहऱ्याची 'कोलाज' करायचं,
ध्यास एकच त्याला मी केलेलं कोलाज गिफ्ट करायचं...
फाडलेल्या पुस्तकांची अणि तीच पुस्तकं न फाडलेली अश्या दोन स्वरूपात! डबल रद्दी!!
म्हणजे शक्यतो रद्दी घेतानाच मिळाल्यास २प्रती घ्यायचो, पेपर्स, मासिकं, पोस्टर्स, पोस्टकार्ड्स... काहीही.

त्याची वेगवेगळ्या मध्यमात्न चित्रं काढा...
कात्रणं, त्याचे रिकार्ड्स, न्यूज़ हेडलाइन्स जमवा...
पैसे जमवुन त्याच्या स्टाइलचे गोगल्स... काही विचारू नका,
त्यात पुण्यात मैच असेल तर...
दुसऱ्या दिवशी परिक्षा असूनही टिकिटांसाठी वडलांची बोलणी शिव्या श्राप घेउन निर्लज्जा सारखं मैचला गेलेलो!
टीव्हीवर त्याच्या शारजा किव्वा वर्ल्ड कपच्या मैचेसच्या हाय लाईट्स स्क्रॉल करताना बघितल्या की जे बघतोय ते सोडून त्या मैचेस बघत बसायचं! त्यातही तो आउट झाला की मूड जायचा... आणि थेट प्रक्षेपण असेल आणि साहेब ९०-९९वर असतील तर अगरबत्ती लावायचो देवा समोर, आणि जिथे बसलोय तिथे बसून राहाणे... लकी जागा वगैरे प्रकार तर तुम्हा पैकी काही। लोकांनी अनुभवले असतीलच!

असो...
हां तर मला एक किस्सा सांगायचाय
तो सोडून काय बडबड लावल्ये मी... माफ़ करो!

एके दिवशी पेपर वाचत असताना एक न्यूज़ वाचली...
श्री.चंदु बोर्डे यांचा सत्कार,
जडेजा, अझर अणि सचिन प्रमुख पाहुणे!!!
ठिकाण नेहरू स्टडियम..
येत्या शनिवारी,
डोक्यात झीणझीण्या आल्या...
म्हणालो ही संधी सोडायची नाही!
घरी एक फ्रेम होती पिवळ्या रंगाची,
त्यात आमचा फोटो होता,
फॅमिली फोटो असेल...
नीट आठवत नाही,
काढला त्याला...
पटापट एक कोलाज कारायला तयारी सुरू...
रद्दी आणि मी... मी आणि रद्दी...
अभ्यास / खेळ गेलेला तेल लावत...
अखंड ६-७तासाच्या 'आर्टअट्टेक' नंतर,
माझं कोलाज रेडी होतं,
आता पाळी होती त्याला पत्र लिहायची...
नेमका मजकूर आठवत नाही :(
पण पात्राच्या शेवटी एक तळटीप लिहिलेली...
हे पत्र जर सचिन सोडून कोणाला मिळालंतर ते कृपा करून ह्या ह्या पत्त्यावर परत पाठवणे वगैरे,
मग कोलाजची रंगीत झेरोक्स...
ह्या सर्व प्रकारात मझ्याकडचे पैसे होत्याचे नव्हते झाले,
मला भान कुठे होतं...
आता १ दिवस उरलेला,
मला झोप नाही सकाळी आठवलं की...
शनिवार म्हणजे आज भजनाला आई बाबा शनिवार वड्यापाशी जाणार,
तिथपर्यंत जायची सोय होइल,
पण हां समारंभ नेमका ६च्या आसपास होता,
तेव्हा आई बाबांबरोबर निघणे निरर्थक,
मी लवकरच निघालो,
४लाच मी स्टेडीयम वर,
प्रचंड गर्दी,
पोलिस बदोबस्त,
खुपच लहान मी त्यामुळे रापाराप गर्दीला चीरत मी लक्षाच्या जवळ पोहोचत होतो, आणि...
अणि मी लक्ष्मण रेशेपर्यंत पोहोचलो,
समोर सुरक्षा फळी...
त्यानंतर २०-३०फुटांवर स्टेज,
स्टेज वर अझर दिसला...
मग अजुन कही वरिष्ठ मंडळी अणि मग शेवटी....
.
.
.
जडेजा!
.
.
.
आइन्क!
सचिन काय दिसेना,
माझे डोळे परत स्टेज वरच्या त्या माणसांत माझा देव शोधायला लागले...
अखेर निवेदनात कळालं की सचिनला यायला जमणार नाहीये :/
हे ऐकताच माझी आवस्था स्वर्गाच्या दारात येउन दरवाज्यात बिघाड झाल्याने परतीची वाट पकडणाऱ्या कमनशीबी माणसासारखी झालेली,
डोळे भरून आलेले, घसा कोरडा...
काय करू आता..
हातातल्या पिशावीतली फ्रेम त्यातलं पत्र...
हृदयाच्या जवळ घट्ट धरून मी एका हवलदाराल हात केला...
म्हणालो, अहो मी सचिन करीता आलोय इथे,
ह्या पिशवीत एक फ्रेम आहे...
मला त्याला द्यायची आहे,
पण तो नाही तर जदडेजाला तरी द्या हो नेउन,
कदाचित तो पोहोचवू शकेल,
त्यानी ऐकून नं ऐकल्या सारखं केलं,
मी परत ज़रा तीच पण ज़रा अजुन वजन पेरत
कळवळीची विनवणी चालू ठेवली,
हा सगळा प्रकार एक लेडी पोलिस पहात होती!
तीने पुढाकार घेउन माझी फ्रेम जडेजाला नेउन द्यायला सांगितली!
आणि त्याआधी
'ह्या फ्रेम व्यतीरीक्त बॉम वगैरे तर नाहीये ना!?''
असं विचारलं,
मी ज़रा घाबरून हसत 'नाही नाही' म्हणालो...

आत्तापर्यंतचा फाडलेला सचिन प्रत्येक चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात होता...
अणि प्रत्यक्षात मात्र त्याचा चेहरा पाहू शकलो नाही ह्याची प्रचंड खंत,
पुढे त्या फ्रेमचं काय झालं असेल,
नक्की कुणाकडे असेल,
ती सचिनला मिळेल का?
तो परत उत्तर पाठवेल का!?
त्याचाकड़े नसेल फ्रेम तर जडेजा ती फ्रेम ठेउन घेइल का!?? अश्या प्रश्नांची उत्तरं मला अजुन मिळाली नाहीयेत,
अणि अजुन ही थोड्याफार प्रमाणात सतावतात,
असो.. ह्या सगळ्या प्रकारात तो समारंभ अर्धवट सोडून निराश हा सचिनवेडा परत निघाला,
खुप भूक लागलेली,
कोरडा घसा अजुन कोरडा...
पैसेही संपलेले,
नेहरु स्टडीयम ते शनीवार वाडा,
धावत धावत...
फ्रेम दिल्याचा आनंद आणि चीडचीड असं काहीतरी विचीत्र पेट्रोल भरून माझं इंजिन सुटलेलं... धापा टाकत,
घाम पुसत पोचलो खळीकरांकडे,
भजनांचा कार्यक्रम संपल्यावर झाला तो प्रकार आई बाबांना संगितला,
पुढचं आठवत नाही, पण जितकं सांगितलं तो प्रकार आयुुश्यात कधीच विसरणार नाही!

त्यानंतर तो खुपदा स्वप्नात वगैरे आला...
भेटून झाल्यावर अगदी मला बस स्टॉप पर्यन्त पण सोडलय त्यानी...
अर्थात स्वप्नातच!

माझ्या तेराव्याला कावळा शिवला नाही तर...
'सचिन सचिन' ओरडा..
कवळा नक्की शिवणार बघा!


© सशुश्रीके.

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!