'गोपाला गोपाला'


।। श्री ।।

११ सेप्टेम्बर २०१४

काय रे काय ऐकतोयस
मी म्हणालो ये ऐक… कानातला एक इर्फोन काढून मी मंदारला दिला
त्याचे डोळे चमकले!
गोपाला गोपाला! ( 'हमसे है मुकाबला' वालं )
मी डोळ्यांनी त्याला हो म्हणालो!
अक्ख गाणं ऐकलं काही नं बोलता!
बस तेव्ह्हा पासून जिगरी वाला… माझं लास्ट इयर
तो १ वर्ष जुनियर क्लास मधला, पण त्यांनी १२वी वगैरे केलेलं, मी १०वी नंतर घुस्लेलो!
पण ३ वर्षांनी रोज हाय हेल्लो करून ही शेवटच्या वर्षी असे नीट बोललो!
ते म्हणतात ना दर आए दुरुस्त आए टाईप्स!

दोस्त भाऊ सखा शत्रू अवघड साधा आगाऊ हळवा भगवा अपूर्ण अजून बरच काही
अगदी माझा क्लोन!
'की नई' आणि 'की काय' हे आमचं नाव एकमेकांच्या फोन डिरेक्टरीत्ल्!
हो हो… बरोबर वाचलयत 'की नई' आणि 'की काय'
आम्ही भेटलो की आजूबाजूच्या समंत सभ्य समाजाला वाटायचं की २ वेडे भेटलेत!
बाआआआआआआआअर्र्र्र्र! असं जोरात किंचाळत वगैरे!
बाल्गन्धर्व, गुड-लक, घाटावर, घरी कुठेही भेटलो तरी असच! बाआआआआआआआअर्र्र्र्र!

त्याची सुंदर बुटकी आजी होती, मागच्या वर्षी देह सोडला.
माझी ओळख झाल्या पासून मंद्याला ( मंद्या म्हणतात त्याला मित्र मंडळी )
ती नेहमी विचारायची!। कसा आहे समीर?
मी पुण्यात नव्हतो ना काम करत!…
त्यामुळे वीकेंडला भेट व्हायची,
पण जेव्ह्हा पण भेटायचो!
अगदी झिप ड्राईव फाईल ऑपन केल्या वर आतली फ़ोल्डरं उताणी पडायची
शब्दांचे मळे, गाण्यांचा सडा, अजीर्ण बडबड घेऊन!
कधी कधी भेटायचा नाही विश्रांतवाडीला आईला भेटायला जायचा
किव्वा दुसरी काहितरी शेंडी!
जाम चिडचीड व्हायची!

घाटावर भेटलो की चहा वर चहा…
माझा घसा म्हणजे जणू नरसाळंच!
त्याचा १ पिउन झाला की माझा २रा संपलेला असायचा,
तो निष्कामकर्म योगी नामक चेहऱ्यांनी मला ' आरे हळू पी रे बाबा! ' मी हसायचो.
मग तो पण मग परत सुरू गप्पा.

नंतर मी दुबईला पळालो,
जाण्याआधी एक कवितेची फ्रेम दिली माझ्या हातात,
दोघांचे डोळे ओले… काही क्षणातच परत हसलो दोघे!
मिठी मारली, इतकी जोरात की मणक्यात्नं काडकान आवाज आला.
तो आवाज अजूनही कडक आहे! मैत्री काय असते त्याचा कडक आवाज!

आठवड्याची भेट आता वर्षात कन्व्हर्ट झाल्ये,
पण अगदी रोज भेटतो आम्ही, मेल्स, चेटिंग चालू असते,
साहेब शिक्षक आहेत सध्या, आणि ईतर ही उद्योग धंदे चालू असतात.
२ वर्षांपूर्वी लग्न बी झाले, सुंदर बायको आहे.
भाड्याचं का होईना घर आहे.

पण ८ वर्शापुर्वी परिस्थिती उलटी होती,
खाण्याचे वांदे होते, कपडे तेच तेच वापरायचा, चपलेला भोक.
तिथून आज इथे पाहिल्यावर सलाम करतो मी त्याला!

हल्ली भेटलो तरी तोच प्रश्ण…
काय रे काय ऐकतोयस 'सध्या'
नेहमीप्रमाणे मी म्हणातो 'ये ऐक'…
गाणं असतं 'गोपाला गोपाला'

#सशुश्रीके.

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!