"शंकर भगवान् ने भेजा है!"

"शंकर भगवान् ने भेजा है!" 

कालच ठरवलेलं... मंदीरात जायचं, दर्शन पण घेता येइल आणि फुलं पण संपल्येत!

ठरल्याप्रमाणे गेलो... दर्शन घेतलं, आज प्रसाद म्हणून डाळ पुरी होती, लैच जड़ झालं पोट सकाळी सकाळी असो... प्रसाद मिळाल्याचा आनंद पण होता.. मनात विचार आला मस्त चहा हवा होता... पण आजुबाजुला काही नाही होटल किव्वा तत्सम, असो... उशीर ही होत होता, म्हंटलं लवकर फुलं घेउ आणि निघु!

फुल वल्याकडे जाऊन 'पांच का देना' म्हणालो... त्यानी हातात चहा चा कप ठेउन म्हणाला.. मंदीर से लाया है... आप लेलो

मला चेहर्यावरचा आनंद लपवता आला नाही... म्हणालो, मै आपको पुच्छने ही वाला था, चाय कही मिलता है यहाँ? और आपने चाय दी! तो म्हणाला... "शंकर भगवान् ने भेजा है!"

#सशुश्रीके
| २९ आँगस्ट २०१४

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!